प्रतीक्षा शिवाची

ज्या सहजतेने काशी किंवा वाराणसी आपल्या इतिहासाचे प्रचंड ओझे वाहते, तशी जगातील फार थोडी ठिकाणे असतील. ही नगरी आपल्या संस्कृतीच्या आत्म्याचे आणि शतकानुशतके आलेली विपरीत परिस्थिती, हल्ले सहन करूनही पुन्हापुन्हा उभी राहत आपल्या अपराजित वृत्तीचे दर्शन घडवते. 

 

 प्रतीक्षा शिवाचीकाशीज्ञानवापीच्या सत्याचा शोधया पुस्तकाच्या माध्यमातून विश्वेश्वर किंवा विश्वनाथाच्या रुपातील शिवाचा अधिवास असणाऱ्या काशीचा इतिहास, तिची प्राचीनता आणि पावित्र्याचे दर्शन घडते. जो या शहरात आपला देह ठेवतो त्याला मोक्ष मिळेल असे वचन प्रत्यक्ष शिव देतो. हे पुस्तक या स्वयंभू ज्योतिर्लिंग विश्वेश्वराच्या इतिहासाचा सखोल शोध घेते. आपल्या भक्तांचे आश्रयस्थान असलेले हे विश्वेश्वर मंदिर हे नेहमीच धर्मांध मूर्तीभंजकांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. परंतु जेव्हा जेव्हा हे मंदिर उद्ध्वस्त करून त्याचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हे मंदिर पुन्हा उभे राहिले आणि भरभराटीला आले. 

 

मंदिराच्या इतिहासातील या प्रलयंकारी घटनांचा लेखाजोखाप्रतीक्षा शिवाचीहे पुस्तक मांडते. जुलमी मुघल बादशाह औरंगजेबाने १६६९ मध्ये या मंदिरावर घातलेला घाव वर्मी बसला आहे. त्याने मंदिर फोडले आणि मंदिराच्या पश्चिमेकडील अर्धवट तुटलेल्या भिंतीवर घुमट उभे करून त्याला मशिदीचे रूप दिले. आज ज्याला ज्ञानवापी मशीद म्हणतात ती मशीद आणि त्याच्या आजूबाजूची आणि अठराव्या शतकात बांधल्या गेलेल्या नव्या विश्वनाथ मंदिराजवळची जागा यावरून नेहमीच वादंग माजलेला आहे. भूतकाळात या मुद्द्यावरून अनेक वेळा रक्तरंजित दंगली झाल्या आहेत. इंग्रजी सत्तेच्या काळातही या जमिनीच्या मालकी आणि ताब्याच्या मुद्द्यावरून अनेक वेळा ब्रिटिश न्यायालयांचे दरवाजे ठोठावले गेले आहेत, त्यासंबंधीचे खटले चालवले गेले आहेत. स्वातंत्र्यानंतरही हा पूर्ण परिसर मुक्त करावा अशी मनीषा हिंदूंच्या मनात कायमच वास करत आली आहे. २०२१ ला नव्याने दाखल करण्यात आलेल्या एका खटल्याने या फार काळापासून ठसठसणाऱ्या जखमेवरची खपली निघाली. भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होऊ नये यासाठी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत वारंवार अपीले करूनही हे सर्वेक्षण झाले आणि जानेवारी २०२४ मध्ये या सर्वेक्षणाने या पूर्ण प्रकरणातील सत्य उजेडात आणले. 

 

विक्रम संपतचे हे नवे पुस्तक या मंदिराचा बहुपेडी इतिहास, त्यात आलेली नाट्यमय वळणे, घडलेल्या गूढ घडामोडी, या जागेवरून झालेले कडाक्याचे वादविवाद या साऱ्या गोष्टी उलगडून दाखवते. कितीतरी काळ ज्ञानवापीमध्ये दडपून आणि लपवून ठेवलेल्या या गुपितांना या पुस्तकाच्या रूपाने वाचा फुटली आहे.

Buy on Amazon

Share

Meet The Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रतीक्षा शिवाची”

Your email address will not be published. Required fields are marked *